SwaroopYog Ashram 687 KB.jpg

 

|| स्वरूपयोग प्रतिष्ठान ||

 
Meditation 2.jpg

स्वामी माधवानंद: कार्य परिचय 

 

'स्वरूपयोग' म्हणजे काय?

 

आपल्या प्रत्येकात असलेले चैतन्य हे आपले 'स्वरूप'. स्वरूपाशी एकरूपतेची अनुभूती घेणे आणि ज्ञानमय जाणीवेत राहून दिव्य जीवन जगणे म्हणजे 'स्वरूपयोग'. 

 

स्वरूपयोग प्रतिष्ठानाची कार्य उद्दिष्टे:

भारतीय संस्कृतीची मध्यवर्ती धारा आणि धारणा स्पष्ट करणे

सत्वशक्तीचा विकास 

ध्यानयोगाचे शास्त्रीय मार्गदर्शन  

राष्ट्रीय आणि अध्यात्म प्रेरणा जागृती

ध्यानाचे मार्गदर्शन  |  प्रवचने  |  केंद्रे  |  शिबिरे  |  प्रकाशने

 
600x4501.jpg

ऑनलाईन केंद्र

दर रविवारी रात्री ८ वाजता

ऑनलाईन केंद्र फेसबुक लाईव्ह(स्वरुपयोगच्या फेसबुक पेजवर) द्वारे प्रक्षेपित केले जाते.

पूर्वीच्या केंद्रांचे विडिओहि ह्या पेजवर बघता येईल.

स्वरुपयोग फेसबुक पेज: https://www.facebook.com/SwaroopyogPratishthan/

vartapatra 388 KB.jpg

स्वरूपयोग वार्तापत्र

सर्व स्वरूपयोग वार्तापत्र वर्गणीदार, लाईफ मेंबर्स, आणि साधकांसाठी निवेदन या वेळी करोनाच्या पार्श्वभूमीमुळे वार्तापत्र छपाईसाठी कागद मिळणे, छापखाना चालू असणे, पोस्टिंग इत्यादी गोष्टी होणे अवघड होते. त्यामुळे वार्तापत्र मजकूर तयार असूनही छपाई लवकर होणार नाही हे लक्षात घेऊन, या वेळचे इ-वार्तापत्र ग्रुप्सवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आपण ते पोस्ट केले, तसेच तो अंक आपण आपल्या वेबसाईटवरही अपलोड केला आहे. अजूनही छापखाना सुरू झालेला नाही त्यामुळे अंक छपाई केव्हा होईल हे सांगता येत नाही. तरी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती ! धन्यवाद !

plant-in-desert-facebook-cover.jpg

युवा-फोरम

स्वामींच्या आवाजातील युवा फोरम ५-मिनिट्स ऑडिओ:

mailing list 3.jpg

Subscribe

युवा फोरम, वार्तापत्र, कार्यक्रम इत्यादी इमेल वर मिळण्यासाठी, स्वरूपयोग च्या Mailing List चे सभासद व्हा

DSC_0248.JPG

स्वामी माधवानंद:परिचय

स्वामी माधवानंद हे आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराज व पुढे स्वामी-स्वरूपानांद (पावस) यांच्याकडून स्वामी माधवनाथ (पुणे) यांच्यापर्यंत चालत आलेल्या नाथसंप्रदायाच्या ध्यानयोगप्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी आहेत.

पूर्वायुष्यात स्वामी म्हणजे, डॉ. माधव नगरकर यांनी पुण्यातील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट येथून वनस्पतीशास्त्रातील कवकशास्त्र किंवा मायकॉलॉजी या विषयात लायकेन्स या वनस्पती वर्गावर संशोधन केले. त्यावर त्यांनी पुणे विद्याठाची Ph. D. डिग्री प्राप्त झाली. १९८७-८८ मध्ये डॉ. नगरकरांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन डि. सी. येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट येथे, पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप मिळवून लायकेन्स या विषयात डॉ. मेसन हेल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. पुढे त्यांनी ब्रिटिश म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रि, लंडन आणि म्युनिक बोटॅनिकल गार्डन्स, जर्मनी येथेही या विषयात काम केले. १९८९ पासून पुढे त्यांनी मश्रुम कल्टिवेशन या विषयात संशोधन केले.

तरुण वयापासून ते नित्य ध्यान-साधना करीत आले आहेत. संशोधनपर वृत्ती आणि साधना यातून ध्यानयोग प्रक्रियेचा अभ्यास करून तिच्या सूक्ष्म अंतर्स्थितीचे त्यांनी आकलन करून घेतले. गीता, योगसूत्रे आणि संतवाङ्‌मयात जी आत्मयोग प्रक्रिया सांगितली आहे, तिचे मध्यवर्ती सूत्र काय? हे मर्म जाणून तिचा अवलंब करुन त्यांत सांगितलेला अनुभव त्यांनी प्रथम स्वत:मधे घेतला. त्यावरून गीतेतील ध्यानयोग हा सर्वात स्पष्ट, स्वच्छ, काहीही गूढ नसलेला असा आहे हा त्यांचा निष्कर्ष आहे. या ध्यानयोग प्रक्रियेचे मार्गदर्शन करणे हे त्यांच्या कार्याचे सूत्र आहे. हा ध्यानयोग कोणालाही आचरता येतो, त्यातून व्यावहारिक फायदे म्हणजे चित्ताची स्थिरता, एकाग्रता आणि सृजनक्षमता म्हणजे creativity वाढणे. या गोष्टी सर्वांना आणि विशेषत: युवकांना जीवनात अत्यंत उपयोगी आहेत आणि भारतीय अध्यात्मशास्त्राचा तर हा गाभाच आहे म्हणून स्वामीजी ह्या शास्त्राचे विवरण करीत असतात.

स्वामींच्या कार्याचे दुसरे महत्त्वाचे अंग म्हणजे आपण ज्या छोट्या - मोठ्या उपासना करतो, जे काही स्तोत्र-मंत्र म्हणतो, त्यांचे अर्थ आणि उद्देश जाणून घेऊन ते म्हणावेत आणि उपासना करावी यावर त्यांचा भर आहे. उदाहरणार्थ गायत्री मंत्र हा self-conciousness शी बुद्धी संबंधित करण्यासाठी आहे. कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्याचा उद्देश तिथे असणार्‍या आज्ञाचक्राला स्पर्श व्हावा हा आहे, देवळात घंटा वाजवून आपण देवाला वर्दि देत नसतो तर स्वत:ला दर्शनासाठी alert करीत असतो. आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींमागचा अर्थ कोणलाही पटेल या पद्धतीने भाषासौंदर्यासह ते व्यक्‍त करीत असतात. 

कोणताही गूढवाद निर्माण न करणे, व्यक्‍तिपूजा, स्तुती यांचे वातावरण निर्माण न होऊ देणे, मैत्रीपूर्ण, खेळकर विनोदी प्रसन्नशैली यामुळे येथील विविध शहरांमधील आणि परदेशातील अमेरीका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथील युवक स्वामींकडे आकृष्ट झाले आहेत. ते विविध केंद्रे चालवतात. अमेरिकेतले एक युवा केंद्रे तर टेलिफोनिक कॉन्फरन्सिंग स्वरूपात चालते.

या केंद्रात युवक-युवती गीता-ज्ञानेश्वरी दासबोध तसेच राष्ट्र्पुरुषांच्या जीवनावर १५ ते २० मिनीते आपले स्वाध्याय सादर करतात. देशातल्या - परदेशातल्या युवकांची विषय आणि वक्‍त्तृत्त्व यांची तयारी स्वामी करून घेतात. थोर व्यक्‍तिमत्वांच्या अभ्यासातून आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा विकास हे यामागचे सूत्र आहे म्हणून त्यात विवेकानंद, लोकमान्य टिळक, सावरकर याबरोबर आईन्स्टाईन आणि बाबा आमटे यांवरही स्वाध्याय होतात. युवांच्या गायन-वादन क्षमतांना युवा-केंद्रे व कार्यक्रमांत चांगलाच वाव दिला जातो. युवां कलाकारांचे अप्रतिम गायन आणि स्वामींचे विवरण हा 'भावतरंग कार्यक्रम' देशात आणि परदेशात चांगलाच प्रतिसाद मिळवतो. दोन वेळा हा कार्यक्रम अमेरिकेतील BMM मध्येही झाला यावरून हे लक्षात येईल. स्वामींच्या अमेरिका-कॉनडा दौर्‍यात, शहरांमध्ये, ध्यान-प्रबोधन आणि शक्य तेथे भावतरंग हे कार्यक्रम असतात.

स्वामी दरवर्षी युवा शिबिरे घेतात. त्यात एका शिबिरात ३०० ते ५०० युवा भाग घेतात. युवा केंद्रे व शिबिरातले कार्यक्रम यांचे संयोजन आणि संचलन युवाच करतात. किमान ७०% प्रेझेंटेशन युवांचं असतं. यात ग्रुप डिस्कशन पासून दिंडीत नाचण्यापर्यंत विविध कार्यक्रमात युवा रंगून जातात त्याप्रमाणे ध्यानातही सहज एक तास बसू शकतात हे फार पाहण्यासारखे आहे.

शिबिरांची स्थानेसुद्धा आकर्षक असतात. गेल्या वर्षी शिबिर ग्वाल्हेरला झालं. त्यापूर्वी कन्याकुमारीला विवेकानंदपूरम येथे तर शिबिराला साडे-सातशेजण होते. रत्नागिरी, गोवा, नागपूर, पन्हाळगडावर या शिबिरात तर आपला आवडता नट अतुल कुलकर्णी कलेमागे कष्ट किती आणि प्रेझेंटेशन मागचं प्रिपरेशन कसं असतं हे सांगून युवकांना प्रेरणा देऊन गेला.

स्वामींच्या latest CDs लोकमान्य टिळक, 'रामकृष्ण - विवेकानंद आणि आपण' या प्रेरणादायी आहेत. गीतेच्या अध्यायाचे विवरण ग्रंथ, ध्यानयोग, 'दिव्यत्त्वाचा संस्पर्श' हे तुकाराम महाराज दर्शन - युवा संवाद - ज्यात युवांच्या प्रश्नांची युवांच्या भाषेत उत्तरं दिली आहेत, तसेच सरस रामायणातल्या सुंदर उपकथांचा रस चाखायला हवा असा आहे. शेगावच्या गजानज महाराजांच्या चमत्कारापेक्षा व्यक्‍तिमत्त्व आणि प्रबोधनाला जास्त महत्त्व दिलेला त्यांचा सर्वात अलिकडचा ग्रंथ आहे. सद्ध्या रामरक्षा - विवरण ग्रंथ चालला आहे. अनेक प्रकाशने आहेत पण एकूण हे लिखाण कशा प्रकारचं आहे हे व्यक्‍त केलं.

स्वामींची प्रवचने सर्वत्र प्रिय होण्याचं कारण त्यातला आल्हाददायक मोकळेपणा, शास्त्रीय बैठक याबरोबरच वाङ्‌मय सौंदर्य प्रकट करणारी त्यांची शैली. यात गीता-ज्ञानेश्वरीच्या सौंदर्यापासून कबीरांसह विविध संत एवढेच नव्हे तर मोरोपंत आणि केकावली हे ही विषय येतात. संतांप्रमाणेच टिळक-सावरकर हे ही येतात.

आज स्वामी आणि साधक डोंगरगाव, मुळशी येथील गिरीवनात स्वरूपयोगाश्रम उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्राचीन ऋषींच्या आश्रमांच्या धारणा प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रयत्न यशस्वी होवो.